Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळमध्ये ५ मे पासून बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा

कुडाळमध्ये ५ मे पासून बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संस्था असलेल्या बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या वतीने बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ मे २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण शिबीर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या वतीने करण्यात आले आहे.


बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यात नावलौकिक असलेली आणि ५३ वर्षांची यशस्वी नाट्य परंपरा असलेली नाट्यसंस्था आहे. ही संस्था वर्षभर अनेक सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवित असते. बाल रंगभूमीसाठी सुद्धा या संस्थेचे फार मोठे योगदान आहे. या संस्थेच्या वतीने येत्या ५ मे ते १५ मे या कालावधीत बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चिं. त्र्यं. खानोलकर ललित केंद्र, कुडाळ हायस्कुल येथे दररोज सायंकाळी ४.०० ते ६.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. यासाठी वय वर्षे ५ ते १५ हा वयोगट आहे. ही कार्यशाळा सशुल्क आहे. या बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत शोण घुर्ये आणि साहिल देसाई हे नाट्यशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी गुरुप्रसाद शिरसाट (९४२०३०७३२३) किंवा सचिन कोंडस्कर (९९७५५५२४१२) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांनी केले आहे.

rapan bottom