Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सावंतवाडीत आवाज साधना शास्त्र कार्यशाळा संपन्न

सावंतवाडीत आवाज साधना शास्त्र कार्यशाळा संपन्न

रघुकुल स्वरविहार संस्थेचे आयोजन

डॉ. समीर दुबळे यांचे मार्गदर्शन

निलेश जोशी | कुडाळ : सावंतवाडी येथील 'रघुकुल स्वरविहारच्या' बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी रोटरी क्लब हॉल, सावंतवाडी येथे 'आवाज साधना शास्त्र (Voice Culture) कार्यशाळा' संपन्न झाली. पं. डॉ. समीर दुबळे, पुणे यांनी आवाज साधना शास्त्राबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. समीर दुबळे हे नामवंत गायक तसेच आवाज साधना शास्त्राचे अध्यापक असून पं. राम माटे, पं. अशोक रानडे व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत. दोन सत्रांमध्ये संपन्न झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सर्व वयोगटांतील ६१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे निवेदन संजय कात्रे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पं. डॉ. समीर दुबळे, महेश जोशी, अभिजीत बारटक्के (पुणे), दिनकर परब, संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळेस सुरुवात झाली.


सकाळच्या सत्रामध्ये आवाज साधना शास्त्राची प्राथमिक ओळख, गाणारा आवाज विकसित आणि प्रशिक्षित करण्यासाठी श्रवणाचे व श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे महत्व तसेच तानपुरा नीट ऐकून हुंकार व आकार योग्य पद्धतीने लावण्याचे तंत्र याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन पं. डॉ. समीर दुबळे यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये गानोच्चार व शब्दोच्चार सुधारण्यासाठी पाटाक्षरांचा सराव, आवाजाचे काही प्राथमिक व्यायामप्रकार तसेच सुगम संगीतामध्येही आवाजाचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन डॉ. दुबळे सर यांनी केले. आवाजाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या आवाजाविषयीच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेच्या शेवटी प्रशिक्षणार्थींमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सौ. रश्मी सामंत-नाडकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये सावंतवाडीतील नामवंत वकील ॲड. शामराव सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रशिक्षणार्थींचा असाच सुंदर प्रतिसाद मिळाल्यास आवाज साधना शास्त्राबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळावे या हेतूने येणाऱ्या काळात 'दोन दिवसीय निवासी कार्यशाळा' आयोजित करण्यास आम्ही तत्पर आहोत असे संस्थेच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) यांनी सांगितले. या कार्यशाळेला फार चांगला प्रतिसाद लाभला.

rapan bottom