कै.राजू रावले यांच्या स्मरणार्थ, मार्गेश्वर क्रीडा मंडळ, हडी व सिंधू रक्तमित्र तर्फे आयोजन
दिपिका देऊलकर | मालवण : मालवण तालुक्यातील हडी येथे मार्गेश्वर क्रीडा मंडळ, हडी, सिंधू रक्तमित्र व हडी गावचे विक्रमी रक्तदाते कै. राजू रावले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी श्री मार्गेश्वर देवस्थान हडी शाळा नं. २ येथे सकाळी ९ ते १ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे.
तरी या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मार्गेश्वर क्रीडा मंडळ, हडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


