गटार बांधणे व रस्ता काँक्रिटीकरण कामाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते भूमीपूजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील नंदू माणगावकर घर ते आडारी मुख्य रस्ता मार्गांवर गटार बांधणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा भूमिपूजन शुभारंभ माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर कामासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण नगर परिषदेच्या अंतर्गत नगरोत्थान - जिल्हास्तर-जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी महायुती सरकारच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. यापुढेही आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक विकासकामांसाठी प्रयत्नाशील असल्याचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सांगितले. दरम्यान, विकासकाम मंजूर झाले बाबत नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक जगदीश गावकर, गणेश गावकर, राजन गावकर, अक्षय माणगावकर, गणेश चव्हाण, संतोष चव्हाण, कांदळकर किरण चव्हाण, विवाद खानोलकर, शामा आजगावकर, अर्जुन चव्हाण, बाबू बगाड, मुन्ना फाटक, महेश गावकर, कमलेश कोचरेकर आदी उपस्थित होते. अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली. फोटो : गटार बांधणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा भूमिपूजन शुभारंभ माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. (अमित खोत, मालवण)

