Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

एसआरएम कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाची आविष्कार कार्यशाळा

एसआरएम कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाची आविष्कार कार्यशाळा

१४ महाविद्यालयातील ४३ विद्यार्थी आणि २४ प्राध्यापक सहभागी

निलेश जोशी | कुडाळ : बदलत्या काळानुसार संशोधनाची गरज लक्ष्यात घेऊन विध्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ स्मिता सुरवसे यांनी केले . मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी जिल्हास्तरीय आविष्कार कार्यशाळा रविवारी, २७ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयात पार पडली, त्या वेळी डाँ स्मिता सुरवसे ह्या बोलत होत्या. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सुनील पाटील उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या डाँ स्मिता सुरवसे यांनी भूषविले.

आपल्या मनोगतात डॉ. सुनील पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय निवासी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ. डी एम सिरसट यांनी केले. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठ विकास विभागाच्या ओ एस डी डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. सुनीता शैलजा, डॉ. रूपा राव या उपस्थित होत्या. प्रकल्प सादरीकरण, पीपीटी तयार करणे, गटचर्चा , संशोधन प्रकल्प तयार करून सादरीकरण करणे अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व शिक्षकाना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध १४ महाविद्यालयाचे ४३ विद्यार्थी प्रतिनिधी व २४ प्राध्यापकानी सहभाग घेतला. कार्यशाळेच्या उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन डाँ कमलाकर चव्हाण यांनी केले तर डॉ. कॅप्टन एस टी आवटे यांनी आभार मानले . ही २० वी आविष्कार कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. प्रमोद जमदाडे, तसेच प्रा भावेश चव्हाण, डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. नागेश काळे, डॉ. रविंद्र ठाकूर, प्रा राहुल देशमुख, प्रा प्रणव तेंडोलकर प्रा संतोष चौगुले, प्रा खेमराज कुबल, प्रथमेश दळवी, मंदार कोरगावकर , श्याम दाभोलकर, अक्षय परब यांचे सहकार्य लाभले.

rapan bottom