Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शिरोड्यात पाकिस्तानचा झेंडा जाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध

शिरोड्यात  पाकिस्तानचा झेंडा जाळून  पहलगाम हल्ल्याचा निषेध

मेणबत्त्या पेटवून शहिद पर्यटकांना श्रद्धांजली

काँग्रेस, उबाठा शिवसेना पदाधिकारी उपस्थित

निलेश जोशी | कुडाळ : काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीयांचा बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना पोसणाऱ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन शिरोडा येथे काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच मेणबत्त्या पेटवून शहिद पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले की अतिरेक्यांनी 28 निष्पाप नागरिकांचा बळी घेऊन त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या आणि त्यांना हे कृत्य करायला लावणाऱ्या पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त सरकारने करावा. देशातील 140 कोटी जनता यासाठी सरकारच्या पाठीशी आहे. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना इर्शाद शेख म्हणाले, ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो.

यावेळी बोलताना वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब म्हणाले आजपर्यंत पाकिस्तानने अनेकवेळा भारताच्या भूमीवर अतिरेकी हल्ले घडवून आणले. आता या नापाक पाकिस्तानला पुन्हा भारताच्या भूमीवर असे भ्याड हल्ले करण्याची हिंमत होणार नाही असा धडा भारत सरकारने शिकवावा. यावेळी बोलताना वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर म्हणाले, आता भारतीयांची सहनशक्ती संपली आहे आता भारत सरकारने पाकिस्तानचा नकाशा बदलून टाकण्याची वेळ आली आहे. यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मेणबत्त्या पेटवून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब, वेंगुर्ला तालुका काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर, रेडी जि.प. विभागीय अध्यक्ष अभिजीत राणे, शिरोडा काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, निलेश मयेकर,कौशिक पांडुरंग परब,बाळा जाधव,पंकज मसूरकर, राम परब,ओम परब,श्रवण गावडे, विकास कावळे, शिवसेना शाखा प्रमुख राकेश परब, वेंगुर्ला युवासेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ, शेखर झाटिये, विराज राऊत इत्यादी उपस्थित होते.

rapan bottom