Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

अपघातात जखमी बँक कर्मचारी रवींद्र बागकर यांचे निधन

अपघातात जखमी बँक कर्मचारी रवींद्र बागकर यांचे निधन

कुडाळ येथे महामार्गावरील अपघातात झाले होते जखमी

निलेश जोशी | कुडाळ : मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळपनाका येथील ओव्हरब्रिजवर गेल्या बुधवारी १६ एप्रिल रोजी दुचाकी आणि रोडरोलर यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार रवींद्र भास्कर बागकर (वय ६५ वर्षे, रा. नेरूरपार बांधीवडेकर टेम्ब, ता. कुडाळ) यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान आज सकाळी निधन झाले.

नेरूरपार, बांधीवडेकर टेम्ब, तालुका कुडाळ येथील रहिवाशी रवींद्र बागकर (वय ६५) हे सेवानिवृत जिल्हा बँक कर्मचारी १६ एप्रिल रोजी सकाळी ओरोस येथे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात आपल्या एक्सेस दुचाकीवरून (MH-07-AR-0513) निघाले असता कुडाळ ओव्हर ब्रीजवर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ती पुढे जात असलेल्या रोड रोलरवर आदळली. यात रविंद्र बागकर यांच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना तत्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. मात्र, बागकर गंभीर जखमी होते. त्यांना श्वसनांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.

गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु होते. पण त्या दरम्यानच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते.

rapan bottom