Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

ब्रेनस्ट्रोक | वायरीतील युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

ब्रेनस्ट्रोक | वायरीतील युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

मालवण : वायरी येथील महेश प्रमोद मातोंडकर (२८) या युवकाची मेंदूच्या रक्तस्रावामुळे प्रकृती गंभीर असून त्याचा जीव वाचविण्यासाठी उपचाराची आवश्यकता आहे. सध्या महेश याच्यावर मुंबईतील सोमय्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली.त्याच्या संपूर्ण उपचारासाठी किमान पंधरा लाख रूपयांची आवश्यकता आहे. मातोंडकर यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने मातोंडकर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. यामुळे महेश याच्या उपचारासाठी दाते, सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन मातृत्व आधार फाऊंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.वायरी भूतनाथ येथील माणगावकर काजू फॅक्टरीनजीकचे रहिवासी असलेले प्रमोद मातोंडकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी प्रमोद मातोंडकर यांची पत्नी प्रियांका मातोंडकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या घटनेला वर्षही लोटले नसताना त्यांचा मोठा मुलगा महेश हा कामानिमित्त मुंबईत आहे. नुकताच त्याचा विवाह झाला असून घर सावरणारा महेश हा ब्रेनस्ट्रोक येऊन बाथरूममध्ये पडला. लागलीच त्याला मुंबई येथील सोमय्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून तो बेशुद्ध अवस्थेत आहे.

डॉक्टरांनी संपूर्ण उपचारासाठी १५ लाख रु. खर्च सांगितला आहे. महेश याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. त्याच्यावर उपचार सुरूच आहेत. मातोंडकर कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे. यामुळे दानशूर व्यक्तींनी महेश याच्या उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहन कुटुंबियांनीही केले आहे.

सदर मदत रक्कम मातृत्व आधारकडे जमा होणार आहे. महेश मातोंडकर याला आर्थिक मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बैंक, शाखा तारकर्ली, ता. मालवण, खाते क्रमांक ०६१४०००००००५२३७, आयएफएस नंबर SIDC०००१०६१ (संपर्क- ९४०४३९६१८२)

rapan bottom