Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जि. प. केंद्र शाळा पोईप येथे शैक्षणिक साहित्य वितरण

जि. प. केंद्र शाळा पोईप येथे शैक्षणिक साहित्य वितरण

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप केंद्र शाळा नं. १ येथे पोईप गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर श्रीधर पोईपकर यांनी आपले वडील कै. श्रीधर पोईपकर यांच्या स्मरणार्थ जि. प. केंद्र शाळा पोईप मधील विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग) देणगी स्वरुपात दिल्या. या स्कूल बॅगचे वितरण पोईप गावचे परशुराम नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात परशुराम नाईक यांच्या समवेत माजी उपसरपंच संदीप सावंत, पोईप ग्रा पं चे उपसरपंच संपदा सावंत, शाळा समिती अध्यक्ष सोनिया चव्हाण, केंद्र मुख्याध्यापक विकास घाडीगावकर, सहाय्यक शिक्षिका अश्विनी पांचाळ, सिद्धी परब, प्रमोद पाटील, प्रसाद चव्हाण पत्रकार संजय माने पत्रकार अनिल तोंडवळकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रमुख्याध्यापक विकास घाडीगावकर म्हणाले की पोईप गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पोईपकर यांचे घराणे शिक्षण प्रेमी असून त्यांचे वडील कै.श्रीधर पोईपकर हे शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले होते. वडिलांचा वारसा त्यांचे पुत्र प्रभाकर पोईपकर यांनी चालविला असून जि.प.केंद्र शाळा पोईप मधील विद्यार्थ्यांसाठी ४३ स्कूल बॅग तसेच प्रशालेच्या अंगणातील फेवर ब्लॉक साठी २५००० रुपयांची रोख देणगी दिली. याबाबत पोईप ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रभाकर पोईपकर आणि कुटुंबियांना धन्यवाद देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन मुख्याध्यापक विकास घाडीगावकर यांनी तर आभार प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा उपक्रमशील शिक्षक प्रमोद पाटील यांनी केले.

rapan bottom