Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ मध्ये १० मे पासून कोकण रत्न बॅडमिंटन टूर्नामेंट

कुडाळ मध्ये १० मे पासून कोकण रत्न बॅडमिंटन टूर्नामेंट

सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपचे आयोजन

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा

कुडाळ : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने येत्या १० ते १३ मे या कालावधीत कोकणरत्न बॅडमिंटन टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे ११, १३ आणि १५ या वयोगटातील स्पर्धकांसाठी हि स्पर्धा असून संत राऊळ महाराज महाविद्यलयांच्या बॅडमिंटन हॉल मध्ये रोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत कोकण विभागातून सुमारे ३०० स्पर्धक सहभागी होतील अशी माहिती सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपचे डॉ. अमोघ चुंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारची सिंधुदुर्गमध्ये होणारी हि पहिलीच स्पर्धा असल्याचेही डॉ. चुबे यांनी सांगितले.
येथील हॉटेल लाईम लाईट मध्ये सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने या बॅडमिंटन स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी डॉ. अमोघ चुबे यांच्यासह ऍड. सुहास सावंत, योगेश नाडकर्णी, समीर साखळकर, जयेश धुरी, किरण सावंत, प्रथमेश सावंत उपस्थित होते.
माहिती देताना डॉ. चुबे यांनी सांगितले कि, कोकणातील मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी हि स्पर्धा आहे. ११ वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यासाठी एकेरी, १३ वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यासाठी एकेरी आणि १५ वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यासाठी एकेरी व दुहेरी अशा गटात हि स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची या स्पर्धेला मान्यता आहे. खेळाडू महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनला रजिस्टर असणे बंधनकारक आहे. खेळाडूंनी आपली नावे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या ऑफिशियल साईट वर नोंदवणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी एकेरीसाठी एक हजार आणि दुहेरी साठी २ हजार प्रवेश फी राहील. या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके असणार आहेत.
कोकणातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, युवा पिढीला शारीरिक व मानसिकदृष्टया सुदृढ व सक्षम बनविणे, खेळाकडे आकर्षित करणे हा हा स्पर्धेमागचा उद्देश आहे.कोकणातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे ३०० खेळाडू, त्यांचे पालक या स्पर्धेच्या निमित्ताने कुडाळ मध्ये येणार आहेत. त्यामुळे पर्यटन वाढीसाठीसुद्धा या स्पर्धेचा फायदा होणार असल्याचे डॉ. चुबे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी जयेश धुरी (मोबा. क्र. ९८९२१९०९०९), किरण सावंत (८७६६४४३६७९) किंवा समीर साखळकर (९८८१८८३८८४) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom