तालुक्याच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड
सचिवपदी विठ्ठल राणे तर खजिनदारपदी अजय सावंत
निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी विजय पालकर तर सचिव पदी विठ्ठल राणे यांच्यासह सर्व कार्यकारिणीची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षासाठी करण्यात आली आहे
जिल्हा पत्रकार संघ निरीक्षक गणेश जेठे व सुहास देसाई यांच्यासह जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरस्कर तालुका पत्रकार समितीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक, तालुका पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष निलेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया वासुदेवानंद ट्रेड सेंटर सभागृह येथे पार पडली.
यात उपाध्यक्ष रवींद्र गावडे व विलास कुडाळकर , खजिनदार अजय सावंत तर सहसचिव चंद्रप्रभ बोगार यांसह कार्यकारणी सदस्य पदी भरत केसरकर, प्रसाद राणे,गुरुप्रसाद दळवी, अरुण अणावकर,प्रमोद म्हडगूत, काशीराम गायकवाड,निलेश जोशी, प्रमोद ठाकूर, प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य यांच्यासह पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा अध्यक्ष उमेश तोरस्कर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक तर सल्लागार सदस्य म्हणून जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष श्री पालकर म्हणाले पत्रकार समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना या दोन वर्षाच्या कालावधीत सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रमासह शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी आमची वाटचाल असणार असल्याचे स्पष्ट केले निरीक्षक श्री गणेश जेठे यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कुडाळ तालुका पत्रकार समितीची ही निवड संपूर्ण बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या निरीक्षक सुहास देसाई यांनीसुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

