Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक नागरीकांच्या सहाय्याने नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास झाला.
शहरातील पोस्ट ऑफीस चौकात रस्ता ओलांडणारे पादचारी सुभाष कुबल यांना गोवा येथून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या डंपर चालक मेलवीन झुजे परेरा (वय 43, रा.मडगाव गोवा) यांच्या ताब्यातील डंपरची धडक बसली. यात कुबल रस्त्यावर पडले, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रिक्षा व्यावसायिक आणि नागरिकांनी त्यांना लागलीच नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहीती मिळताच शहरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनींसह नागरिकांनी रूग्णालयात धाव घेत, जखमीला उपचारासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यास सहकार्य केले. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर पोहेकाॅ. पी.एन.बुथेलो यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार डंपरचालक मेलवीन परेरा याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान कुडाळ शहरातून होणारी बेदरकार डंपर वाहतूक कळीचा मुद्दा बनला आहे.

rapan bottom