रहिवाशी नागरिकांनी मानले मंदार केणी व मालवण नगरपरिषद यांचे आभार
मालवण : धुरीवाडा साई मंदिर नजीक असलेल्या संस्कृती पार्क आणि कोरल रेसिडेन्सीना जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण करण्यात आले आहे. माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या पाठपुराव्यातून येथील रहिवाशी यांची मागणी असलेले हे रस्ता काम मालवण नगरपरिषद माध्यमातून पुर्ण झाले आहे. याबाबत रहिवाशी नागरिकांच्या वतीने मंदार केणी व मालवण नगरपरिषद यांचे आभार मानण्यात आले.

