Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

महेश राऊळ यांना 'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार २०२५' प्रदान

वेंगुर्ला : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार–२०२५" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार श्री. महेश राऊळ यांना कोल्हापूर येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी देशभरातून आलेल्या ३,००० हून अधिक प्रस्तावांमधून महेश राऊळ यांची निवड करण्यात आली होती. त्यांचे रक्तमित्र संघटक म्हणून योगदान, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य, सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून भूमिका तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. आ. सतेज उर्फ बंटी डी. पाटील आणि मा. प्रा. जयंत आसगावकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महेश राऊळ यांना गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

rapan bottom