Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

"सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र" चे उद्या प्रकाशन

"सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र" चे उद्या प्रकाशन

लेखक अनंत सावंत प्रभावळकर यांची माहिती

निलेश जोशी | कुडाळ: "सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र" या अनंत सावंत प्रभावळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दि. २५ एप्रिल २०२५ रोजी रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, कुडाळ बाजारपेठ येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजिला आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अनंत वैद्य आहेत. पुस्तक कोकणी रानमाणुस प्रसाद गावडे यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. कार्यक्रमाला कुडाळ नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, कुडाळचे तहसीलदार श्री. विरसिंग विसावे, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्मिता सुरवसे व श्री. अरविंद शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती आहे.लेखक हे कुडाळ गावचे सुपुत्र असून त्यांचे शालेय शिक्षण एम.एस्सी., एम.ए. (तत्वज्ञान) आहे.त्यांनी संमोहन, ज्योतिषरत्न, किर्तनालंकार व जैव विविधता असे वैविध्यपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम केले असून त्यांनी सीमाशुल्क अधीक्षक या पदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांचा "श्रीमद बळी महाराजा फिलॉसॉफीकल फाउंडेशन" हा न्यास असून न्यासाच्या नियोजित उद्दिष्टांपैकी एक महाराष्ट्राला जागतिक संस्कृतीचे माहेरघर सिद्ध करणे व त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आहे.न्यासाच्या सदर उद्दिष्टानुसार हे पुस्तक असून त्यातील विक्रीतून येणारी अर्धी रक्कम ही न्यासाला देण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील दायमाबाद इथून पाकिस्तानातील बालाकोट पर्यंत पसरलेली सिंधू संस्कृती ही गाव रहाटीतील कोकणी माणसाने कशी निर्माण केली त्याचे विविधांगी चित्रण या पुस्तकात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने विशद केले आहे.

rapan bottom