Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पहलगाम हल्ल्याचा महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून जाहीर निषेध

निलेश जोशी | कुडाळ : पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी, महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख अनिकेत र. वालावलकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास संयुक्तरीत्या प्रसिद्धीस दिले आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पहलगाम येथे झालेला हा नुसता आतंकवादी हल्ला नसून हा हल्ला राष्ट्राच्या स्वाभिमानावर होता, हिंदू धर्मावर असलेल्या अभिमानावर होता, आज ते होते उद्या बहुदा आपल्यापैकी कोणीही असू शकतं……… नाही शक्यता नाकारता येत नाही.
त्या कुतूबने आमच्या दत्ताजी शिंदे यांना विचारलेलं क्यू पाटील.. हमारे साथ तुम और लाडोगे? तेव्हा अभिमानाने दत्ताजी सांगतात … क्यू नही..!! बचेंगे तो और भी लढेंगे..!!! पण सध्याच्या काळात कुतूबशाह विरोधात लढण्यात आपण कमी पडत आहोत, कारण आपण जात, प्रांत, भाषा ह्या मुद्द्यावर युद्धभूमीत आपल्यातच युद्ध करत आहोत, असा एक युद्ध जो आतून आपल्या हिंदू धर्माच्या एकात्मकतेला पोखळ करत जात आहे..
त्यामुळे सद्य काळातील कुतूब जेव्हा विचारतो की क्यू हिंदुओ और भी कटोगे? आणि तेव्हा … क्यू नही बटेंगे तो और भी कटेंगे ? असं म्हणण्यापलीकडे आजच्या हिंदूंकडे गत्यंतर नसतं, कारण आपण विखुरलेलो आहोत.


महाराष्ट्र ब्राह्मण सभा हे नुसतेच ब्राह्मण मंडळ नव्हे तर आम्ही राष्ट्र, हिंदू धर्म, आणि राष्ट्रपुरुष ह्यांच्या विरोधात केलेल्या / झालेल्या प्रत्येक शाब्दिक, व्यक्तिशः भ्याड हल्ल्याचा वेळोवेळी निषेध व्यक्त करतो. काल पहलगम मध्ये जो आतंकवादी हल्ला करण्यात आला त्या भ्याड हल्ल्याचे आम्ही महाराष्ट्र ब्राह्मण सभा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या निष्पाप हिंदू नागरिकांच्या दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. बटेंगे तो कटेंगे… एक आहोत तर सेफ आहोत. असे या पत्रकात म्हटले आहे.

rapan bottom