Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लीम समाजातर्फे निषेध

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लीम समाजातर्फे निषेध

दोषींविरोधात कडक पावले उचलून कठोर कारवाई करा

मुस्लिम समाजाचे कुडाळ तहसीलदारांना निवेदन

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्या मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. आज मुस्लिम समाजाच्या वतीने कुडाळ तहसीलदार याना निवेदन देत या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहून हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राज्य व केंद्र शासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम बांधवानी या निवेदनाद्वारे केली आहे. .


या निवेदनात म्हटले आहे, आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लीम समाजातर्फे विनम्र निवेदन करत आहोत कि, काल दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर आणि अमानुष हल्ल्यात निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला, याबद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.अशा हिंसक आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. आमचा समाज नेहमीच शांतता, सद्भाव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने उभा राहिला आहे व यापुढेही राहील.


दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निर्दोष नागरिकां बद्दल आमच्या मुस्लीम समाजातर्फे तीव्र शोक व्यक्त करत आहोत आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ला अत्यंत भ्याड, अमानवी आणि देशाच्या शांततेस बाधा आणणारा आहे. भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्वधर्मीय लोक एकत्र आहोत आणि अशा हिंसक कृत्य करणा-याना कठोर शासन व्हायला हवे.


या पत्राद्वारे आम्ही प्रशासनाच्या व सरकारच्या योग्य ती कारवाई करण्याच्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा दर्शवितो. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभा आहे आणि अशा घटनांचा तीव्र निषेध करतो. तसेच, आम्ही तहसीलदार साहेब यांच्यामार्फत राज्य व केंद्र शासनापाशी मागणी करतो की अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाजाचे मुश्ताक शेख, नाझीम मुकादम, एजाज नाईक, सर्फराज मुकादम, सर्फराज नाईक, जावेद नाईक, फारुख दोस्ती, जहेन शेख, मुबीन दोस्ती, डॉ. मुजफ्फर आवटे. नियाज शहा, अब्दुल गोधड आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

rapan bottom