Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'व्हिजन' नसलेले मुख्याधिकारी ...

'व्हिजन' नसलेले मुख्याधिकारी ...

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केला मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा

मागील तीन वर्षात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मालवण पालिकेचा कितवा क्रमांक आला तेही मुख्याधिकाऱ्यांनी जाहिर करावे

मालवण : मालवण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अलीकडेच “व्हिजन मालवण” या स्मरणिकेची छपाई केली आहे. मालवण पालिकेबद्दल आपल्या विकासाचे व्हिजन काय आहे, त्याची माहिती व फोटो या स्मरणिकेमध्ये छापली गेली आहे. यावरून माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकारी यांना टिकेचे लक्ष करताना त्यांच्या कारभाराचा पंचनामा केला आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून आपल्या प्रशासक कालावधीत ही कामे केली असती तर त्याचे कौतुक होणे क्रमप्राप्त होते. पण आमच्या कालावधीत शहराच्या विकासाचे व्हिजन ठेवून तसा प्रस्ताव करून त्याला मंजुरी घेऊन केलेल्या कामाचे फोटो प्रसिद्ध करुन आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न या स्मरणिकेत मुख्याधिकाऱ्यांनी केला आहे, असा हल्लाबोल कांदळगावकर यांनी केला आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी या स्मरणिकेतील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत रंगविलेल्या भिंती आणि सामाजिक संस्थेंचा, शाळांचा सहभाग घेवून फोटोसेशन पुरते केलेल्या स्वच्छता मोहिमेचे फोटो सोडून कुठले काम आपल्या संकल्पनेतून केले हे जाहीर करावे. खरोखरच स्वच्छतेवर काम केले असेल तर मागील तीन वर्षात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मालवण पालिकेचा कितवा क्रमांक आला तेही जाहिर करावे.

नेहमी इव्हेंट करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या महागड्या छापलेल्या स्मरणिकेची छपाई सुद्धा जाणूनबुजून विधानसभा आचारसंहिता कालावधीत केली. जेणेकरुन या कामाचे श्रेय कुठल्याही लोकप्रतिनिधीना जाणार नाही. तसेच ज्यांच्या कालावधीतील कामाचे फोटो छापून बनविलेल्या स्मरणिकेतून त्याच लोकप्रतिनिधीना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे.

यापूर्वी मागील तीन वर्षाच्या कालावधीतील आमच्या काळातील मंजूर कामाकडे या प्रशासकाकडून कसा दुर्लक्ष करण्यात आला आहे, याबाबत आम्ही सातत्याने आमची भूमिका मांडत होतो. या बाबतची लेखी निवेदनही तत्कालीन पालकमंत्री रवीद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांना दिली होती. यामध्ये पालिकेचे भाजी मार्केट, आवार येथील अग्निशमन इमारत, मामा वरेरकर येथील एसी मल्टिपर्पज इमारत यांची अर्धवट कामे, फोवकांडा पिंपळ येथील दोन वर्ष बंद असलेला रंगीत कारंजा, खत निर्मितीच्या बंद असलेल्या मशिन, पाणी पुरवठा योजनेच्या कामात होत असलेली दिरंगाई, भुयारी गटार योजनेचे बंद असलेले काम, मच्छीमार समाजाला गृहीत धरून मच्छी मार्क़ेट इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या गाळ्यांचे भाडे निश्चित करुन न केलेली लिलाव प्रक्रिया, बायो टॉयलेटच्या अडगळीत पडलेल्या गाड्या, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्यावेळी काढून ठेवलेला बोर्डिंग ग्राउंड येथील हायमास्ट वर्षभर पुनः न लावल्या बद्दल, विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याबाबत, डास फवारणी बंद असल्याबाबत, हॉटेल सायबा, गणपती मंदिर आडारी येथील सुशोभिकरण यांच्या देखभाल दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष, सेल्फी पॉइंटची झालेली दुरावस्था अशा अनेक कामाच्या विलंबाबाबत या निवेदनामध्ये उल्लेख केला होता. त्यामुळे जर मुख्याधिकाऱ्यांना स्मरणिकाच छापायची होती तर खर तर या विलंबित कामाची छापायला पाहिजे होती. पण या कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन आपल्या प्रमोशनसाठी वरिष्ठांकडून गोपनीय अहवालावर चांगला रिमार्क मिळावा या हेतूने अशी स्मरणिका छापून आपल्या कामाची छाप पाडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे.

या स्मरणिकेत पंतप्रधान यांच्या मालवण भेटीच्या वेळी आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या वाहनाना अडथळा होऊ नये यासाठी त्तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील गुरे, कुत्रे यांना पकडून ठेवण्यात आले होते त्यांचेही फोटो छापण्यात आले आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. जर आपल्याकडून मागच्या तीन वर्षात ही कुत्रे आणि गुरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली असती तर कमलाकर खोत सारख्या एका जेष्ठ नागरिकाला तीन वेळा उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती. आता आमदार निलेश राणे यांनी या तक्रारीची दखल घेतल्यानंतर निविदा काढण्यात आल्या आहेत.
आपल्या मतदार संघातील विकास कामाबाबत सकारात्मकता असेल तर काय होऊ शकते हे आमदार निलेश राणे निवडून आल्यानंतर बायोटॉयलेटच्या गाड्या, खत निर्मितीच्या मशीन ज्या प्रशासकीय कालावधीत तीन वर्ष बंद होत्या त्या स्वतःच्या खर्चाने तीन महिन्यात दुरुस्त करून देवून पालिकेला काम कसे केले पाहिजे हे दाखवून दिले आहे. आमदार निलेश राणे यांनी शहराला चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून डास निर्मूलनासाठी स्वतःच्या खर्चाने दिलेली फॉगिंग मशिन अडगळीत ठेवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी मालवण व्हिजन बद्दल बोलूच नये. कारण व्हिजन हे पुढच्या कामाचे असते. अशी टिका झोड महेश कांदळगांवकर यांनी केली.

rapan bottom