कणकवली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्य न्यायालय, मुंबई व मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, ओरोस यांच्या निर्देशानुसार कणकवली दिवाणी न्यायालय येथे शनिवार १० मे रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारीकडील प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती कणकवलीकडे दाखल करावीत, असे आवाहन दिवाणी न्यायालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

