संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण सीसेगाळूवाडी येथील समस्त चव्हाण समाज बांधवांची कुलस्वामिनी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे यानिमित्त शनिवार दुपारनंतर भवानी माते चरणी नवस बोलणे, फेडणे, गाऱ्हाणे, सायंकाळी जोगवा मागणी, दिवटी पेटवणे व इतर गोंधळ धार्मिक विधीनंतर रात्रौ 9:00 वाजल्या पासून महाप्रसाद होणार आहे. तरी चव्हाण समाज बांधवांनी तसेच भाविकांनी त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चव्हाण परिवाराच्या वतीने भवानी प्रसादिक भजन मंडळ गोळवण सीसेगाळूवाडी तसेच सामाजिक कार्यकर्ते आबा चव्हाण यांनी केले आहे.

