Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे 26 एप्रिलला पालघर मध्ये अधिवेशन

महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे 26 एप्रिलला पालघर मध्ये अधिवेशन

१५/३/२०२४ च्या जाचक संच मान्यता परिपत्रक सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगरी निकष लावून रद्द करावे यासाठी अधिवेशनात ठराव मांडणार

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांची माहिती

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी चे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे सोमवार दिनांक 21 /4 /2025 रोजी सभा संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी शिक्षण महर्षी स तू कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालघर येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी नियोजनाची सभा आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे सोमवार दिनांक 21/ 4 /2025 रोजी सायंकाळी चार वाजता घेण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिनांक १५/३/२०२४ च्या जाचक संचमान्यतेमुळे एकूण १९८ शाळांपैकी ९१ शुन्य शिक्षकी तर ६० एक शिक्षकी शाळा होणार आहेत.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे शिक्षण धोक्यात आले आहे.ग्रामीण भागातील शाळा बंद झाल्यास गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल.


या सभेला संबोधित करत असताना शिक्षक लोकशाही आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिनांक 15/ 3/ 2024 रोजी चे संच मान्यता जाचक परिपत्रक सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगरी निकष लावून रद्द करण्यात यावे यासाठी पालघर येथील राज्य अधिवेशना मध्ये ठराव मांडणार आहोत असे सांगितले. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ चे राज्य अधिवेशन शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी शिक्षण महर्षी स तु कदम विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालय महाविद्यालय पालघर येथे संपन्न होणार आहे सकाळी आठ तीस वाजता पालघर येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून शोभायात्रा निघणार असून दहा वाजता ध्वजारोहण होईल. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याध्यक्ष जी के थोरात या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.


अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, नामदार पंकज भोयर शिक्षण राज्यमंत्री ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सत्यजित तांबे, किशोरजी दराडे, आमदार जयंतजी आसगावकर, आमदार ज मू अभ्यंकर ,पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, दिंडोरी खासदार भास्करराव भगरे, तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह ,शिक्षण उपसंचालक संपत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अधिवेशन हे दोन सत्रात संपन्न होणार असून या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना व शैक्षणिक कामे, 15 मार्च 2024 संच मान्यता शासन आदेशातील निकषासंदर्भात फेरविचार करून परिपत्रक रद्द करणे, ऑनलाईन कामे कमी करणे ,नवीन शैक्षणिक धोरण, सीबीएससी अभ्यासक्रम, शिक्षक भरती, शिपाई भरती बंदी, कला क्रीडा शिक्षक भरती, या व इतर समस्या राज्याच्या वरिष्ठांसमोर मांडण्यात येणार आहेत यावेळी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.


महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफचे राज्यस्तरीय अधिवेशन पालघर येथे होत आहे या अधिवेशनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ )मार्गदर्शक गुरुनाथ पेडणेकर व सचिव विजय मयेकर यांनी सभासदांना आवाहन केले सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शंभर शिक्षकांना अधिवेशनाला घेऊन जायचे असा निर्धार उपस्थित सर्वांनी केला. या सभेमध्ये अजय शिंदे ,विजय मयेकर, गुरुनाथ पेडणेकर, भाऊसाहेब चवरे ,अशोक गीते ,रमेश ठाकूर ,राजेश सिंगनाथ ,मारुती पुजारी, आप्पाजी मोहिते, सूर्यकांत सांगेलकर, सुरेश कोळी, धनराज सजगुरे ,किशोर वालावलकर, सुजित गंगावणे, राजेंद्र सावंत भोसले, सुनील कांबळे, जयसिंगराव वाघमोडे, एस एन सावंत, पी एम कांबळे, व्ही आर चव्हाण ,अर्जुन माळी, राहुल समुद्रे, सचिन पालकर ,सिद्धेश कानसे ,सुरेश तुंबडा, संजीव राणे ,विशाखा पालव, विनिता कविटकर, संजीवनी गवस, मृणाली जाधव, शिमल गावडे ,संजय शेवाळे ,संतोष पवार, प्रशांत चव्हाण, संभाजी कोरे, शिवराम सावंत हे जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.


सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी तालुका अध्यक्ष दिगंबर मोरे यांनी स्वागत केले सभेचे प्रस्ताविक विजय मयेकर, सूत्रसंचालन विशाखा पालव आभार भाऊसाहेब चवरे व संजय शेवाळे यांनी मानले.

rapan bottom