Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवणात महायुती पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

मालवणात महायुती पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा ; मच्छिमारांच्या दृष्टीने कल्याणकारी अशा ऐतिहासिक निर्णयाचा मालवणात आनंदोत्सव

अमित खोत | मालवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानेतृत्वातील महायुती शासनाने राज्यातील मच्छिमारांच्या दृष्टीने कल्याणकारी असा ऐतिहासिक निर्णय घेत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. मत्स्य व्यवसायिकांमध्ये समाधान आनंद व्यक्त केला आहे. मालवणात भाजप व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भरड नाका येथे फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. महायुती सरकारचा विजय असो… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है… मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, भाजपा मालवण शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हाउपाध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गांवकर, खरेदीविक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, राजन वराडकर, गणेश कुशे, बबलू राऊत, किसन मांजरेकर, सुरेश बापर्डेकर, दाजी सावजी, विलास मुणगेकर, मोहन कुबल यांसह मच्छिमार प्रतिनिधी व इतर उपस्थित होते.

यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा हि मच्छिमारांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीला न्याय देण्याचे काम मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून पाठपुराव्यातून महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून पुर्ण होत आहे. यासाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचाही पुढाकार राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने या मागणीला मंजुरी देत मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला. राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमातील हा एक अलौकिक निर्णय आहे. मत्स्य व्यवसायाला कृषिचा दर्जा नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेणे, प्रकल्प राबविणे यामध्ये मच्छिमारांना अडचणी येत होत्या. आता या अडचणी दूर होऊन मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच विविध लाभ, सुविधा व योजना देणे सुलभ होणार आहे. नीलक्रांतीचे प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे, असेही सावंत म्हणाले.

यावेळी रविकिरण तोरसकर यांनी महायुती सरकारने मच्छिमारांची अनेक वर्षांची मागणी केली आहे, याबद्दल महायुती सरकारचे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे मच्छिमारांच्या वतीने तसेच भाजप व शिवसेना यांच्यातर्फे आम्ही आभार मानतो असे सांगितले.

rapan bottom