Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कर्नाटक येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई

कर्नाटक येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई

महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मुणगे समोर सुरु होती अनधिकृत मासेमारी

नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात : नौकेवरील मासळीचा लिलाव करून पुढील कारवाई सुरु

अमित खोत | मालवण : महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मुणगे समोर अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या कर्नाटक उडपी येथील नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई करतं ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मत्स्यविकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाचा कारभार गतिमान झाला आहे. सोबतच परप्रांतीय अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर ही कारवाईचा धडाका सुरूच आहे.

सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री मुणगे समोर अठरा वाव खोल समुद्रात अंदाजे ९-१० सागरी मैल दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी, सिंधुदुर्ग तेजस्विता भ. करंगुटकर, या गस्ती नौकेच्या माध्यमातून नियमित गस्त घालत होत्या. यावेळी कर्नाटक राज्याच्या
जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली श्रीम. वेदवती स. पुथरण, रा. मारीकंबा नगर थोत्तम, उडपी, राज्य कर्नाटक
यांची नौका श्री महालक्ष्मी 3 नों. क्र.- IND-KA-२-MM- ६२६८ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मुणगे समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर सहा खलाशी
होते. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. तसेच नौकेवरील मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात येत होती.

अंमलबजावणी अधिकारी तेजस्विता भ. करंगुटकर, अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी अमित हरमलकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण/सर्जेकोट व रक्षक सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

rapan bottom