Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जिल्ह्यात 'त्या' कारणाने होणाऱ्या आत्महत्यांना नेमकं जबाबदार कोण ?

जिल्ह्यात 'त्या' कारणाने होणाऱ्या आत्महत्यांना नेमकं जबाबदार कोण ?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल

जिल्ह्याच्या वाढत्या जीडीपीवर भाष्य करणारे गप्प का ?

निलेश जोशी  | कुडाळ : सन 2024 या पूर्ण वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ४७९ जणांनी आपले जीवन संपविले. याची कारणे अनेक असली तरी या आत्महत्यांच्या कारणांमध्ये मोठा टक्का नोकरी नसल्यामुळे बेरोजगारी व उद्योगधंद्यांमध्ये कर्जबाजारी हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात अनेक जणांना मोठ्या अपेक्षेने संधी देऊन पाहिल्यात. परंतु आजतगायत कोणीही इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. किंवा शाश्वत असे उद्योगधंदेही आणू शकले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जीडीपीचा टक्का नेहमी वाढतच असल्याचे केंद्रीय माजी सूक्ष्म व लघुउद्योग व राज्याचे महसूल तथा उद्योग मंत्री राहिलेले नारायण राणे नेहमी सांगतात मग असे असताना सुद्धा जिल्ह्यात ही परिस्थिती का? असा सवाल मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून उपस्थित केला आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि उद्योग मंत्री ज्याप्रकारे तिन पैकी दोन आमदार यांच्या पक्षाचे असतानाही पक्षवाढीसाठी वारंवार बैठक घेताना दिसत आहेत. तसे उद्योग मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग धंदे आणण्याकरिता एकही बैठक घेताना दिसत नाहीत ही मोठी खंत आहे.


पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच सिंधुदुर्ग चिपी विमानतळ सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची घोषणा केली. मुळात जिल्ह्यातील विमानतळ नेमकं न चालण्याचे कारण काय हे शोधण्याची गरज आहे. नुसता निधी खर्चून सुशोभीकरण करून चिपी विमानतळ चालणार नाही. तर जिल्ह्यात मोठ मोठे उद्योगधंदे आणल्यास व पर्यटन स्थळांचा शाश्वत विकास केल्यास विमानतळ चालणे शक्य होईल.
त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या बेरोजगारी, उद्योगधंद्यांमध्ये कर्जबाजारी यामुळे आर्थिक नैराश्येतुन होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून प्रतिनिधित्व करत असताना प्रामाणिक उपाययोजना करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

rapan bottom