गावठी बैलगाडा विभागात स्वयंभू सांबप्रसन्न प्रथम
चुनवरे येथील राकेश परब मित्रमंडळ पुरस्कृत स्पर्धा
संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील चुनवरे येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश परब आणि मित्रमंडळाच्या वतीने मालवण तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय खुली तसेच गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालोंड बेलाचीवाडी सरपंच पूर्वा फणसगावकर, उपसरपंच लक्ष्मण उर्फ आपा चव्हाण, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, जॉन नऱ्होना, पोईप सरपंच श्रीधर नाईक, वेरळ सरपंच धनंजय परब, महेश बागवे, उद्योजक सुरेश नेरुरकर प्रितम गावडे, अनंत भोगले, बाबुराव चिरमुले, छोटू ठाकूर, जितेंद्र परब, विलास पांजरी, दत्ताराम आंबेरकर, पंकज परब, कणकवली नगरसेवक बाळा सावंत, भाजपा अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नायक तहसीलदार शिंदे साहेब, दशावतारी कलावंत ओम प्रकाश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार वेर्लेकर डॉक्टर करंबेळकर व राकेश परब मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय खुल्या गटात सोबा जुगाई दुनियादारी दुनियादारी ग्रुप कशेडी यांचा बैलगाडा प्रथम क्रमांक प्राप्त ठरला असून 25000चे पारितोषक पटकावले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक पांडुरंग पाटील केरली यांच्या बैलगाड्याला मिळाला असून त्यांना 20000चे पारितोषक मिळाले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक अभिजीत रमेश गुरव रुपये 15000. चतुर्थ क्रमांक बबन झोरे रुपये 10000. पाचवा क्रमांक सिद्धेश्वर लक्ष्मण परब कासरल रुपये 7000. स्पर्धेतील सहावा क्रमांक रमेश काशीराम पावसकर रुपये 5000. सातवा क्रमांक मिलिंद केळकर कुसबे तालुका कुडाळ रुपये 3000. अशी पारितोषिके देण्यात आली.

गावठी बैलगाडा विभाग स्तरावर प्रथम क्रमांक स्वयंभू सांबप्रसन्न पाटगाव यांना रुपये 7000. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक दत्त साई कन्स्ट्रक्शन लांजा रुपये 5000. तृतीय क्रमांक शैलेंद्र गणपत कदम मुरडाव रुपये 3000. चतुर्थ क्रमांक शैलेंद्र गणपत कदम मुरडाव 2000. अशी पारितोषिके देण्यात आली. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम हे बरोबरच राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक ढाली देण्यात आल्या. स्पर्धेचे समालोचन रंजीत पाटील कोल्हापूर यांनी केले, तर सूत्रसंचालन आशिष ठाकूर तर टाईम कीपर म्हणून निळकंठ मेस्त्री कणकवली यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की मालवण तालुक्यात प्रथमच राकेश परब व मित्रमंडळाने बैलगाडा शर्यत आयोजित करून येथील रसिकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. राकेश परब हे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीयसहाय्यक असून त्यांचे राणे परिवाराशी सलोख्याचे संबंध आहेत. ग्रामीण भागात राहूनही राकेश परब यांनी आपल्या मित्र मंडळाच्या वतीने वेळोवेळी विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित केले याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देत आहोत याही पुढे राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी बैलगाडा शर्यत आयोजित करून येथील रसिकांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी इच्छा दत्ता सामंत यांनी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश परब, दयानंद प्रभूदेसाई, संतोष मुणगेकर, निखिल परब, यांच्या समवेत राकेश परब मित्र मंडळाच्या चुनवरे व वडाचापाट येथील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


