कुडाळ : श्री देवी महालक्ष्मी मंदिर, कुडाळचा १५ वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरवात ठीक सकाळी ८:०० वाजता नवचंडी पाठवाचन व धार्मिक विधींनी होणार आहे. त्यानंतर ठीक सकाळी १०:०० वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यनारायण पूजेनंतर दुपारी १२:०० वाजता आरती व तीर्थप्रसाद, व लगेच त्या नंतर दुपारी १२:३० वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल.
त्यानंतर ठीक सायंकाळी ७:३० वाजता योगेश्वर प्रासादिक भजन मंडळ,पावशी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या पश्चात ठीक रात्री ९:०० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ यांच्या “भक्त पुंडलिक” या नाट्यप्रयोगास सुरवात होणार आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ, कुडाळ यांनी केले आहे.

कुडाळ येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिराचा उद्या १५ वा वर्धापन दिन
