Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी मधून देणार मदत : पालकमंत्री नितेश राणे

चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी मधून देणार मदत : पालकमंत्री नितेश राणे

चिपी विमानतळाच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक

फ्लाय 91 कंपनीचे अधिकारीही उपस्थित

मुंबई : चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देत विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

सिंधुदुर्गातील चिपी ते मुंबई विमानसेवा गेल्या काही दिवसांपासून रखडली असून त्याचा मनस्ताप जिल्हावासियांना व पर्यटकांना सहन करावा लागतो.ही विमानसेवा निरंत सुरू व्हावी तसेच ही विमानसेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीला पालकमंत्री नितेश यांच्यासह फ्लाय 91 कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस,एअरपोर्ट हेड डायरेक्टर श्री कुलदीप सिंग,सिंधुदुर्ग एअरपोर्ट हेड कॅप्टन जय सदाना उपस्थीत होते.

या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चिपी विमानतळावरून मुंबई सेवा कुठल्याही स्थितीत अडथळे न येता सुरू करण्याचे निर्देश देत असतानाच त्यांच्या ही समस्या जाणून घेतल्या. त्यावर योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे पालकमंत्री यांनी आश्वासित करत प्रसंगी विमानवाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच चीपी विमानतळाचा परिसर सुशोभित करण्याची गरज असून त्यासाठी dpdc मधून हातभार लावला जाईल असे सांगितले. चिपी विमानतळावरून अन्य मार्गावर वाहतूक करण्याबाबत ही या बैठकीत चर्चा करण्यात आली.चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरळीत सुरू राहिल्या तर पर्यटन वाढीस चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला

rapan bottom