Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मतदारसंघाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास हेच लक्ष!

मतदारसंघाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास हेच लक्ष!

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

आ. निलेश राणेंच्या माध्यमातून पहिल्या चार महिन्यातच शेकडो कोटी विकासनिधी : दत्ता सामंत

मालवण | प्रतिनिधी : मालवण-कुडाळ मतदारसंघाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास हेच लक्ष आहे. जे दहा वर्षात घडले नाही ते करतं असताना मतदारसंघाला विकासकामातून न्याय मिळवून द्यायचा आहे. सर्व गावांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देत असताना किनारपट्टीकडे विशेष लक्ष दिले जाईल. ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास साध्य करणार. अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी वायरी भुतनाथ येथे बोलताना दिली.

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा 2024-25 अंतर्गत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून 20 लाख निधी मंजूर करण्यात आलेल्या मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे यांच्याहस्ते संपन्न झाला.

सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत उभी राहणार आहे. यात सरपंच, उपसरपंच दालन, ग्रामविकास अधिकारी दालन, डेटा एंट्री ऑपरेटर कक्ष, ग्राममहसूल अधिकारी दालन, सभा हॉल कर्मचारी बैठक अशी व्यवस्था असणार आहे. ग्रामपंचायत इमारत हे गावचे मंत्रालय आहे. जनहिताच्या आणि गाव विकासाच्या निर्णयांची अंमलबजावणी होत असताना आवश्यक असणारे सर्व सहकार्य केले जाईल. यापुढेही वायरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. सोबतच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत गाव विकासाच्या दृष्टीने जेजे शब्द गावागावात देतील तो पुर्ण करण्याची जबाबदारी ही आपली आहे. असेही आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर, ग्रामविकास अधिकारी डी. व्ही. कांबळे, सदस्य संजय लुडबे, प्रतीक्षा केळूसकर, पांडुरंग मायनाक, विकास मसुरकर, माजी सरपंच सुचिता मातोंडकर, भाई ढोके, माजी उपसरपंच शाम झाड, अरुण तळगावकर यांसह माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, सोशल मीडिया जिल्हप्रमुख हर्षद पारकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, दाजी सावजी, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख उद्योजक केदार झाड, देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राजू बिडये, ऋषिकेश सामंत, संदेश तळगांवकर, ओंकार लुडबे, प्रशांत तोडणकर, गौरव प्रभू, आबा मांजरेकर, महेश लुडबे, बाबा मोरजकर, भाऊ मोरजे, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, राकेश सावंत, निषय पालेकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रगती लुडबे, अयोध्या झाड, जयप्रकाश बोडवे, दत्ताराम मालवणकर यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच जिप बांधकाम उपविभागीय अभियंता संतोष सावर्डेकर, कनिष्ठ अभियंता नितीन पवार, आर्किटेक गौरव पाटकर यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांनी पहिल्या चार महिन्यातच शेकडो कोटी निधी मालवण कुडाळ तालुक्यात आणला. विधानसभेत सर्वच विषयात अभ्यासपूर्ण कार्य करून एक दरारा आपल्या कर्तृत्वातून निर्माण केला. देवबाग गावासाठी 158 कोटी तर तालुक्यातील सर्व किनारपट्टी भागात बंधारा उभारणीसाठी शेकडो कोटी निधी मंजूर करून घेतला. वीज समस्या सोडवण्यासाठी 5 कोटी निधीतून ट्रान्सफर व अन्य कामे मंजूर झाली. ती प्रगतीपथावर आहेत. रस्ते, नळपाणी व अन्य विकासकामेही होत असून गतिमान विकासकामांसाठी विरोधक मोठया संख्येने शिवसेनेसोबत महायुती सोबत येत आहेत. असेही दत्ता सामंत यांनी सरपंच भगवान लुडबे यांना उद्देशून सांगितले.

राणेंशिवाय पर्याय नाही : दत्ता सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास राणेच करू शकतात हे जनतेनेही जाणून लोकसभा व विधानसभा निवासणुकीत मतदानातून दाखवून दिले. विकासकार्य शून्य असलेल्या विरोधकांना घरचा रस्ता दाखवला. यापुढेही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी कटीबद्ध राहतील. जनतेचा विश्वास सार्थ ठरेलं. असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.

rapan bottom