वेंगुर्ला : वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय आणि अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिलला दुपारी ३ ते ५ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेखाली मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत. अॅन्जिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, केमोपोर्ट, दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खड्यांचे ऑपरेशन, हाडाचे फॅक्चर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, डायलेसीस, व्हेरीकोज व्हेन्स, पर्मकॅथ, हाताचा फिस्टुला आदी ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांनी शिबिरास येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे आवश्यक आहे. रुग्णासोबत एका व्यक्तीची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. गरजू रुग्णांनी तात्काळ ७३७८७४९४०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

वेंगुर्ला येथे उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
