शिवसेना उबाठा महिला मालवण तालुका समन्वयक पुनम चव्हाण यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
मालवण : घरगुती गॅस सिलेंडरच्या रक्कमेत मागील आठवड्यांपासून दरवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे तूर्तास ही दरवाढ कमी व्हावी, असे मागणी निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला मालवण तालुका समन्वयक पुनम शिंदे यांनी मालवण तहसील कार्यालयात दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, घरगुती गॅस सिलेंडरच्या रक्कमेत मागील आठवड्यापासून ५० रुपयांचे दरवाढ करण्यात आली आहे. तरी ही केलेली दर वाढ सर्वसामान्य कुटुंबातील घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आर्थिक भुर्दंड आहे. तसेच या महागाईच्या दैनंदिन जीवनात परवडणारी नाही आहे. तरी ही दरवाढ सरकारने सर्वसामान्य जनतेचा विचार करता तूर्तास कमी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला मालवण तालुका समन्वयक पुनम चव्हाण यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला केली आहे.
यावेळी महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख दीपाली शिंदे, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख विद्या फर्नांडिस, युवती जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, युवती तालुका प्रमुख भाग्यश्री खान, उपशहरप्रमुख माधुरी प्रभु, गीताली तळगावकर, श्रीमती लुडबे, दीपा कोलथडरकर आदी उपस्थित होते.

