Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बिडवलकर हत्या प्रकरणी मनसे कडून पोलिसांचे अभिनंदन

बिडवलकर हत्या प्रकरणी मनसे कडून पोलिसांचे अभिनंदन

अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आवाहन

कुणाल किनळेकर यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

निलेश जोशी | कुडाळ : सिद्धिविनायक बिडवलकर हत्येचा योग्य तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच त्याचप्रमाणे सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे व अवैद्य प्रकार आणि यामुळे घडणारे गुन्हे पूर्ण ताकदीनिशी रोखण्यासाठी कडक पाऊल उचलण्याचे आवाहन मनसे कडून करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनाळेकर यांनी म्हटले आहे, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक भीमराव गायकवाड यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून विशेष अभिनंदन. या हत्या प्रकरणातील काही आरोपी हे सत्ताधारी राजकीय पक्षाशी निगडित असताना तसेच आरोपींचे पोलीस खात्यातील काहींशी सलोख्याचे संबंध असूनसुद्धा कोणताही दबाव न बाळगता तसेच योग्यरीत्या गोपनीयता बाळगून सदर हत्या प्रकरण योग्यरित्या हाताळत सर्व प्रमुख आरोपींना जेरबंद केले हे यात विशेष आहे.


मनसेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती देखील केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बिडवलकर खून प्रकरण त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देत असताना या खुन प्रमाणात होणारे राजकारण याकडे दुर्लक्ष करून तसेच राजकीय दबावाला बळी न पडता सिंधुदुर्गच्या युवा पिढीला मोठी आर्थिक आमिषे दाखवत वाममार्गाला लावून त्रासदायक ठरणाऱ्या या समाजविघातक कृतींना ठेचण्यासाठी आपल्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' पोलिसी ब्रीदवाक्याला अनुसरून म्हणजे चांगल्याच रक्षण करणे आणि वाईटाचा नायनाट करणे या धर्मानुसार काम करावे आणि या कामी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही मनसे उपजिल्हाध्यक्ष यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

rapan bottom