Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बिडवलकर खून प्रकरणी अजून एकाला अटक

बिडवलकर खून प्रकरणी अजून एकाला अटक

कुडाळ न्यायालयाने सुनावली 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

निलेश जोशी | कुडाळ : चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी निवती पोलिसांनी अजून एकाला ताब्यात घेतले आहे. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील अनिकेत गावडे याला आज पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला १९ एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणांमध्ये अनिकेत गावडे यांनी संशयित आरोपींना मदत केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.


सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात पोलिसांना अजून काही धागेदोरे सापडत आहेत त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणांमध्ये मृतदेह घेऊन जाण्यासाठी तसेच आरोपींना घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था अनिकेत गावडे यांनी केली होती. भाड्याची गाडी अनिकेत गावडे हे घेऊन आले होते. त्या गाडीमध्ये मृतदेह ठेवण्यात आला होता. तसेच आरोपींसाठी वेगळी गाडी केली होती. त्या गाडीमध्ये अनिकेत गावडे यांच्या समवेत होता. त्यामुळे त्याला या घटनेची माहिती होती, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी कुडाळ न्यायालयात सांगितल्यावर त्याला पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यावरून न्यायालयाने अनिकेत गावडे याला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तसेच आरोपींना घेऊन जाण्यासाठी वापरलेली गाडी हस्तगत करायची आहे. अनिकेत गावडे याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. यासाठी ही पोलीस कोठडी मागितली आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये अजून काही जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश शिरसाट याचा मोबाईल देखील अजून पोलिसांना सापडलेला नाही. ते एक आव्हान पोलिसांसमोर आहे.

rapan bottom