Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम रखडली…

लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम रखडली…

लवकरात लवकर लाभार्थ्यांना रक्कम मिळावी

ठाकरे गट शिवसेना मालवण महिला तालुका समन्वयक पुनम चव्हाण यांचे प्रशासनाला लक्षवेधी निवेदन

मालवण : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात गेल्या काही महिन्यांपासून जमा झाली नाही, तरी सदर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावी, असे लक्षवेधी निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला मालवण तालुका समन्वयक पुनम चव्हाण यांनी मालवण तहसील प्रशासनास दिले आहे

सदर निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. ही योजना निराधार यांना त्यांच्या दैनंदिन चरितार्थात आर्थिक मदत म्हणून दिली जाते. परंतु हा लाभ लाभार्थ्यांना देण्यास वारंवार बेफिकीरपणे दिरंगाई केली जात आहे, असे निदर्शनास येत असल्या कारणास्तव आपण प्रशासक या नात्याने विनंती करत आहोत की, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर न मिळालेली मागील काही महिन्याची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत कार्यवाही व्हावी, तसेच पुढील महिन्यांपासून लाभाची रक्कम वेळच्यावेळी बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अशी मागणी पुनम चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी महिला तालुका समन्वयक सौ पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख दीपाली शिंदे, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख
विद्या फर्नांडिस, युवती जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे,
युवती तालुका प्रमुख भाग्यश्री खान, उपशहरप्रमुख माधुरी प्रभु व वायरी मालवण येथून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी
गीताली तळगावकर, श्रीमती लुडबे, दीपा कोलथडरकर उपस्थित होते.

rapan bottom