Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

संविधानावरील कलमांचा कीर्तनातून मागोवा…

संविधानावरील कलमांचा कीर्तनातून मागोवा…

केंद्रशाळा मसूरे नं. 1 येथील पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर यांचा संविधानाचा जागर

पंचक्रोशीतील ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित

अमित खोत | मालवण : देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचा संविधान अमृत महोत्सव साजरा करत असताना, प्राचीन जनपदांच्या ज्ञानापासून ते आधुनिक संविधानाच्या परिवर्तनकारी शक्तीपर्यंतच्या भारताच्या प्रवासावर चिंतन करण्याचा हा एक योग्य क्षण आहे. संविधानाचा जागर तळागाळापर्यंत झाला पाहिजे आणि म्हणूनच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रशाळा मसूरे नंबर 1 येथे वारकरी पद्धतीने पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानावरील कलमांचा कीर्तनातून मागोवा घेतला. आदर्शवत आणि लक्षवेधी असा हा उपक्रम ठरला. या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांची कर्तव्ये, महत्त्वाची कलमे, शिक्षणासाठी संविधानाचे योगदान आधी विविध विषयांना स्पर्श करत व त्यांची मन जिंकली संविधानातील प्रास्ताविकेचे विश्लेषण करताना व्यवहारातील छोटी छोटी उदाहरणात देत हसत खेळत वातावरण फुलवीत प्रेक्षकांमधून वाहवा मिळवली. या उपक्रमाला केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शीतल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, शिक्षण तज्ञ संमेश मसुरेकर, रामेश्वरी मगर, सुजाता वेडेकर, शिफा शेख, हेमलता दुखंडे यांसह अन्य उपस्थित होते

कीर्तनाला संगीत साथ हार्मोनियम गोपाळ गावडे, ढोलकी अमेय मेस्त्री, तबला यश परब, ओमकार गावडे, समर्थ शिंगरे आणि इयत्ता सातवी आठवीतील विद्यार्थ्यांनी कोरस साथ केली.

rapan bottom