Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

…तर जिल्हाधिकारी कार्यालया समोरच ठिय्या आंदोलन!

…तर जिल्हाधिकारी कार्यालया समोरच ठिय्या आंदोलन!

रस्ता प्रश्नी तोंडवळी ग्रामस्थ आक्रमक ; लोकशाही मार्गाने प्रशासनाला थेट इशारा

गेल्या पाच वर्षाच्या बजेटमध्ये तोंडवळी गावातील रस्त्यासाठी निधी प्राप्त झालाच नाही

मालवण : मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील तोंडवळी फाटा ते महापुरुष मंदिर पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण होणे कामाबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे "ठिय्या आंदोलन" छेडण्याचा इशारा तोंडवळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तोंडवली ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

तोंडवळी फाटा ते महापुरुष मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे दुर्दशा झाली आहे. सदर रस्ता डांबरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वाहने चालवताना अनेक अडचणी येत आहेत. प्रसंगी अपघात होण्याची देखील भीती आहे.

तोंडवळी गाव हा पर्यटन गाव असून खराब झालेल्या रस्त्यामुळे गावात येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचा त्रास होत आहे.

सदर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण होण्यासाठी दिनांक 1 मार्च 2023 रोजी उपोषण केले होते व 26 फेब्रुवारी 2024 रोजी तोंडवळी फाटा येथे रास्ता रोको केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर काम आठ दिवसात पूर्ण करणेबाबत आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी व शासनाने ग्रामस्थांची मागणी वेळोवेळी धुडकावून लावलेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या बजेटमध्ये तोंडवळी गावातील रस्त्यासाठी निधी प्राप्त झालेला नाही.

रस्ता ही गावाचे मूलभूत गरज असून पूर्व बाजूला गड नदीची खाडी व पश्चिमेला समुद्र आणि दक्षिणला नदी व समुद्राचा संगम आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास तोंडवळी फाटा ते महापुरुष मंदिर हा रस्ता तोंडवळी गावासाठी एकमेव दळणवळणाचे मार्ग आहे. तसेच सुरूबन रस्ता डांबरीकरण करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे इन्व्हरमेंटल क्लिअरन्स कडे सादर केलेली असून याबाबत ही अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

त्यामुळे गावासाठी रस्त्याची निकड लक्षात घेऊन 11 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायतची खास ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती. या ग्रामसभेत वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी व लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार करून देखील रस्ता मंजूर होत नसल्याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच या ग्रामसभेत 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे ठिय्या आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले आहेत. तरी आपण याबाबत सर्व स्तरावरून आपल्याकडून योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती तोंडवळी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

rapan bottom