रेडी : रेडी येथील नवसाला पावणाऱ्या श्री गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ शुक्रवार, १८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात पहाटे ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन देवस्थान, रेडी नागोळेवाडी यांनी केले आहे.

रेडीच्या द्विभुजा गणपतीचा उद्या वाढदिवस
