वैभव नाईक यांचे निलेश राणे याना आव्हान
शिंदे गटातील अंतर्गत वादा मुळे बिडवलकर खून प्रकरण उघडकीस
निलेश जोशी | कुडाळ: गृहखात तुमच्याकडे आहे, पालकमंत्री तुमचे बंधु आहेत, तुमचे वडील खासदार आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा मला पोलीस स्टेशनला घ्या आणि माझ्यावर कोणकोणते गुन्हे आहेत त्याची एकदा चौकशी करा, असे थेट आव्हान माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांना दिले आहे. आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर एका व्हिडीओ क्लिप द्वारे केलेल्या आरोपांना श्री. नाईक यांनी पत्रकार देऊन उत्तर दिले.
बिडवलकर खून प्रकरणी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, बिडवलकर खुन प्रकरण हे बाहेर कसे आले हा खरा प्रश्न आहे. शिंदेगटाच्या दोन गटातील अतर्गत वादामुळे हे प्रकरण उजेडात आले. खुन झाला हे एका गटाला माहीत होते. सिद्धेश शिरसाट हा नामचीन दारू व्यापारी आहे. गेल्या दिड वर्षातच हा सक्रिय कसा झाला. नारायण राणेंच्या विजयानंतर याच्याच दारूच्या पैशाने विजयोत्सव साजरा केला. मग अशा गुंडांना कोण पाठीशी घालतोय, याचा आका कोण आहे हा आमचा प्रश्न आहे.
श्री. नाईक पुढे म्हणाले, हे प्रकरण आम्ही लावून धरल्यानंतर त्याच्यावर राज्यस्तरावर आवाज उठवण्यात आला. आम्ही दहा वर्षात जिल्ह्याची कधी बदनामी होऊ दिली नाही. जिल्ह्याची दहशत व बदनामी कोण करतय हे लोकांना माहित आहे.
एका सामान्य माणसाचा खुन झाला आणि त्याच्या मारेकऱ्यांना इथले आमदार पाठीशी घालत आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला. या खुनाची माहीती असताना त्यांनी लपवली. त्यामुळे त्यांना सुद्धा पोलीसांनी ताब्यात घेतले पाहीजे व त्याची चौकशी केली पाहीजे, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली.
सिद्धेश शिरसाट गेल्या दहा वर्षात कधी माझ्यासोबत किंवा शाखेत दिसला तर दाखवावे. या प्रकरणाशी संबंधीत एकही कार्यकर्ता माझ्यासोबत त्यावेळी नव्हता. मला जर हे प्रकरण तेव्हाच कळले असते तर मी तेव्हाच आवाज उठवला असता. हे प्रकरण तुम्हाला माहिती होते तरी तुम्ही ते दडपले, त्याला पाठीशी घातलेत, त्याचा वापर करून घेतला. त्याला ब्लॅकमेलिंग केले. सिद्धेश शिरसाट हा राजकारणात कधीच सक्रीय नव्हता, पण बिडवलकरचा खुन झाल्यानंतर तो सक्रिय कसा झाला? गेल्या दोन वर्षांत सत्ता तुमचीच होती. आम्हाला हे प्रकरण समजल तेव्हा आम्ही विरोधीपक्ष म्हणून आवाज उठवला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा आका कोण आहे हे लवकरच लोकांना कळेल
असे श्री. नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिद्धेश शिरसाट हा गेल्या पंधरावर्षात कधीही माझा कार्यकर्ताच नाही त्याच्यासोबत माझा एकही फोटो नाहीअसे सांगून वैभव नाईक यांनी सिद्धेश शिरसाटशी संबंध असलेले आरोप फेटाळले. खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी तो शिंदेगटात गेला त्याचा निलेश राणे व त्यांच्या समर्थकांशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे त्याला कोणाचा पाठींबा आहे हे लोकांना माहित आहे.
बिडवलकरची बाॅडी कुठे लपवीली हे वैभव नाईक यांना माहित होत या निलेश राणेंच्या आरोपावर बोलताना वैभव नाईक म्हणाले, गृहखाते तुमच्याकडे आहे, पालकमंत्री तुमचे बंधु आहेत, तुमचे वडील खासदार आहेत. यांनी एकदा मला पोलीस स्टेशनला घ्यावे आणि माझ्यावर कोणकोणते गुन्हे आहेत ते एकदा चौकशी करावी असे आव्हान वैभव नाईक यांनी दिले आहे.

