ओरोस : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य भारतरत्न डॉ. विभागांतर्गत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'समता पंधरवडा' साजरा केला जात आहे, या निमित ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व ज्येष्ठ नागरिक मेळावा, स्वच्छता अभियान तसेच रक्तदान शिबिराचे कार्यक्रम झाल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी रक्तदान केले, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे म्हणले. या शिबिरामध्ये ३० दात्यांनी रक्तदान केले. यावेळी एसएसपीएम ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी, नर्स इतर स्टाफ उपस्थित होते. तसेच ओरोस सिद्धार्थनगर वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.

