Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पोईप नाटकुळवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

पोईप नाटकुळवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप नाटकुळवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मागील कित्येक वर्षे पोईप नाटकुळवाडी रस्त्याचे काम झालेले नसून सदर रस्ता अतिशय खराब झालेला आहे. मागील १० वर्षे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे वाडीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता परंतु मागील १० वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नसल्याने याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी ग्रामस्थांनी प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे रस्ता कामाची मागणी केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दत्ता सामंत यांच्यासोबत माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, पोईप शिवसेना शाखाप्रमुख नारायण (पपू ) राणे, पोईप गाव प्रमुख परशुराम नाईक, पोईप भाजप कार्यकारणी अध्यक्ष बाळा पालव व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले की मागील १० वर्षात कुडाळ मालवण मतदार संघात बऱ्याचश्या गावात वाडीतील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत. आपण जिल्हाप्रमुख झाल्यावर मतदार संघात फिरलो असता प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी आपल्याकडे प्रामुख्याने रस्त्या कामाची मागणी केली. त्यांनी मालवण तालुक्यात काही गावात स्वखर्चाने रस्तांची कामे पूर्ण करून दिलेली आहेत. पोईप ग्रामस्थांची ही रस्त्याचीच मागणी असून त्यांना येत्या काही दिवसात शक्य तेवढा रस्ता खडीकरण डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन यावेळी दत्ता सामंत यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत भीमसेन तळकर, सुभाष गोसावी, मंगेश महाजन, चंद्रकांत मोहिते, गणेश परब, उमेश तावडे, लक्ष्मण तावडे, अभिषेक तावडे, विवेक तावडे, प्रतापसिंह सावंत, संतोष तावडे, बाबाजी सावंत, एकनाथ परब, साबाजी परब, सुनील मोहिते, सुधाकर गोसावी, महेश नाईक, अक्षय मोहिते, विकास चव्हाण, कृष्णा माधव, पंकज नाईक, सूर्यकांत नाईक, प्रकाश पालव, भिवा नाईक, रमेश पालव व परशुराम नाईक आदी ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

rapan bottom