Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यासोबत संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यासोबत संपन्न

विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा ; जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांची माहिती

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ ही 89 वर्षे कार्यरत असलेली मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातृ संघटना मानली जाते.संघटनेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली.

या सभेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, वेतन पथक अधीक्षक मुक्तेश्वर छडीदार, अधीक्षिका शलाका तांबे, वरिष्ठ लेखा परीक्षण अधीक्षक निराली साळवी, श्री घोगळे, श्रीमती नाईक हे अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची अधिकारी यांच्या समोर मांडणी केली. त्याला सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत शिक्षणाधिकारी यांनी आश्वासक उत्तरे देऊन सर्व प्रलंबित प्रश्नावर कार्यवाही करुन प्रश्न निकाली काढू असे सांगितले.

शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक यांचे दिनांक 24 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये शालार्थ प्रणाली मधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहिती मधील नोंदणी मध्ये बदल करणे तसेच नव्याने नोंद अपडेट करणे याविषयी आदेशित केलेले आहे. या पत्रानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाकडून आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणाली वरील वैयक्तिक नोंदी अद्यावत करण्याबाबत कळविण्यात आले आहे. याबाबत कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र पत्र शिक्षणाधिकार्यालयामार्फत निघावे या मागणीला होकार देऊन शिक्षणाधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे विना विलंब पत्र काढण्याचे आदेश दिले.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण जिल्ह्यात न लागल्याने नजीकच्या काळातील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे तरी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी सद्यस्थितीला पात्र असणाऱ्या शिक्षकांकडून हमीपत्र घेऊन त्यांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्तावांना मान्यता द्याव्यात, एन पी एस/ आर एन पी एस/ यूपीएस बाबत प्रथम पूर्ण मार्गदर्शन व्हावे व नंतरच विकल्प निवडण्याची संधी द्यावी, ज्येष्ठता डावलून ,ज्येष्ठ शिक्षकांची ना हरकत पत्र न घेता कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक मान्यता दिल्याने ज्येष्ठ शिक्षकांवर होणाऱ्या अन्याया बाबत लक्ष घालून अशा प्रकारच्या नियमबाह्य प्रकरणांना मान्यता देऊ नये, भरारी पथक व शाळा तपासणी पथकात शिक्षकांच्या नेमणुका करताना संघटनांना विचारात घेण्यात यावे, नेमणुका करताना एकाच शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नेमणुका सतत करू नये. संच मान्यते संदर्भातील दिनांक 15 मार्च 2024 चे परिपत्रक रद्द करून होणारा अन्याय दूर करावा. 2005 पुर्वी सेवेत असलेल्या 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन चा लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव सादर करून घेऊन त्यांना मान्यता देण्यात यावी, 10/ 20 /30 वेतन श्रेणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा. संच मान्यतेत कला क्रीडा शिक्षकांचा समावेश करून शाळा तेथे क्रीडा शिक्षक याबाबत कार्यवाही व्हावी.

सर्व प्रलंबित देयके प्रस्ताव याबाबतची कागदपत्रांची चेकलिस्ट तयार करावी. चेकलिस्ट प्रमाणे कार्यवाही व्हावी संघटनेला चेकलिस्ट ची प्रत मिळावी, शिक्षणाधिकारी कार्यालयातील कामकाजाविषयी चा विस्कळीतपणा दूर होण्याबाबत कार्यवाही व्हावी. दिनांक 4 एप्रिल 2025 च्या शिक्षकेतर कर्मचारी खाजगी अनुदानित (अंशता, पूर्णता) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील भरतीच्या अनुषंगाने सुधारित आकृतीबंधाप्रमाणे कार्यवाही होत असताना भरती बाबत पारदर्शकता यावी. शैक्षणिक वर्ष 2025 /2026 यावर्षीच्या वार्षिक सुट्ट्यांचे नियोजन करताना दिवाळी व गणेश चतुर्थी सुट्टी बाबत योग्य नियोजन व्हावे याबाबत शिक्षणाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावा.
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी थकीत बिलाबाबत परळी हायस्कूल श्री बागुल सर, श्री पंचलिंग सर, केळुस हायस्कूल श्री वारंग सर श्रीमती देसाई मॅडम यांच्या बाबतची कार्यवाही पूर्ततेची माहिती मिळावी, प्रलंबित प्रस्ताव पूर्ण व्हावेत कुडाळ हायस्कूल 17 बिले प्रलंबित आहेत याबाबत कार्यवाहीची माहिती द्यावी, बांदा हायस्कूल श्री सांगेलकर सूर्यकांत, श्री पि एस तळणकर पिकुळे हायस्कूल दोडामार्ग यांच्या प्रलंबित वेतन फरकाचे बाबत कार्यवाही व्हावी. वैद्यकीय देयकांबाबत अजित व्हनमाने कुडाळ हायस्कूल, सुदाम मंचरे शिरोडा हायस्कूल संजय पाटील भाऊसाहेब लोके गावकर विद्यालय देवगड, अर्जुन माळी आडेली हायस्कूल वेंगुर्ला, विमल शिंगाडे वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ले, शेष कुमार नाईक कुडाळ हायस्कूल कुडाळ या सर्व प्रकरणांवरती सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे कार्यवाह विजय मयेकर उपाध्यक्ष संजय परब, सुधीन पेडणेकर राज्य फेडरेशन प्रतिनिधी अशोक गीते, जिल्हा सदस्य शिवराम सावंत, अर्जुन माळी, संजीव राणे, संभाजी कोरे, मारुती माने, दशरथ काळे, अजय सावंत, महेश नाईक, सोमनाथ बागुल, आप्पाजी मोहिते, राहुल समुद्रे, नारायण माने, माधव यादव, मारुती पुजारी, अरुण चव्हाण, शिरीष नाईक हे शिक्षक सभासद सभेला उपस्थित होते.

सभेप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांचे अध्यापक संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभेचे स्वागत कार्यवाह विजय मयेकर तर आभार अर्जुन माळी व दशरथ काळे यांनी मानले

rapan bottom