Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'विकास' संस्था वालावलच्या चेअरमनपदी दयानंद चौधरी

'विकास' संस्था वालावलच्या चेअरमनपदी दयानंद चौधरी

निलेश जोशी | कुडाळ : विविध कार्यकारी संस्था वालावल च्या दर पाच वर्षांनी येणाऱ्या या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडून, दयानंद महादेव चौधरी यांच्यासह विठ्ठल वसंत आडेकर, सुमन वसंत बंगे, आनंद श्रीधर चौधरी, गंगाराम मधुकर रेडकर, संदीप मधुसूदन साळस्कर, वासुदेव शंकर वालावलकर, प्रिया रामचंद्र वालावलकर, अश्विनी सखाराम मटकर व अपर्णा अजय सावे, हे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले.


ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून दयानंद चौधरी यांनी अथक प्रयत्न केले. शासकीय अधिकारी विक्रांत आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची प्रथम सभा पार पडली व दयानंद चौधरी यांची अध्यक्षपदी तर प्रिया हेमचंद्र वालावलकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
चौधरी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानले. नूतन कार्यक्ररिणीस मार्गदर्शन करताना चौधरी यांनी सांगितले की, संस्थेच्या आर्थिक उन्नती करिता संस्थेमार्फत आपण जवळजवळ 150 छोटे-मोठे उद्योग करू शकतो. या उद्योगाच्या माध्यमातून संस्थेचा आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. संस्थेची स्वतःची इमारत नसल्याकारणाने ती इमारत होण्याकरिता शासकीय माध्यमातून निधी उपलब्ध करणेबाबत आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. विक्रांत आरेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतून कार्यकारिणीची निवड करावी लागली असती तर, संस्थेस जवळपास एक लाख ते सव्वा लाख निवडणूक प्रक्रियेवर खर्च करावे लागले असते, परंतु दयानंद चौधरी यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याकरता प्रयत्न केल्याने संस्थेचे हे पैसे वाचलेले आहेत, याकरिता मी त्यांना धन्यवाद देतो. शेवटी त्यांनी संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आश्वासित केले. विक्रांत आरेकर यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

rapan bottom