मालवण : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजमंदिर बांगीवाडा, मालवण येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी "१ वही १ पेन" या अभियानात सहभागी होत या अभियानाचे मनसेच्या वतीने कौतुक करण्यात आले.

यावेळी मनसे शहराध्यक्ष सागर जाधव, मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

