मालवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे सामाजिक कार्यकर्त्या सिंधुरक्त मित्र संस्थेच्या मालवण तालुकाध्यक्ष तथा कोकण वाईल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग सल्लागार सौ. शिल्पा खोत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याठिकाणी वैभव वळंजू, समीर जाधव, संदेश जाधव व सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित 'एक वही एक पेन' या अभियानात सहभागी होत शिल्पा खोत यांनी उपक्रमाचे कौतुक केले. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना हे वही, पेन महत्वाचे ठरेलं. असे खोत म्हणाल्या.
यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, भाई कासवकर, संजय जाधव, प्रकाश जाधव, बाळा जाधव, आनंद वळंजू, सौ. बैधवी जाधव, संगीता जाधव, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

