Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत "महाआरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर"

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत "महाआरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर"

कोल्हापूर मधील "अथायु" हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजन

20 एप्रिल रोजी शिरोडा व वेंगुर्ला येथे तर 21 एप्रिल रोजी मालवण मध्ये शिबिर

दिपिका देऊलकर | सिंधुदुर्ग : कोल्हापूर मधील "अथायु" हॉस्पिटल यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत "महाआरोग्य तपासणी" शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

20 एप्रिल रोजी सकाळी १ ते २ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा, ३ ते ५ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय,वेंगुर्ला येथे तर 21 एप्रिल रोजी सकाळी 11 ते २ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, मालवण या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे.

यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट, कॅन्सर, ऑपरेशन, केमोथेरपी, केमोपोर्ट, दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खड्यांचे, हाडांचे फ्रॅक्चर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, डायलेसिस व्हेरिकोज व्हेन्स, पर्मकॅथ, हाताचा फिस्टुला यांचा समावेश आहे.

ऑपरेशन निदान झालेल्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले महाआरोग्य योजनेनुसार पिवळे केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांना व गोव्यामधील रुग्णांसाठी पंडित दीनदयाळ योजनेनुसार ऑपरेशन मोफत केले जाणार आहे.

शिबिरास येताना रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड त्याचबरोबर सर्व जुने रिपोर्ट सुद्धा घेऊन येणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले आहे, त्या रुग्णांसाठी हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा, रुग्णांसाठी मोफत जेवण व पेशंट सोबत एका व्यक्तीला मोफत राहण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी रुग्णांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८९२८७३६९९९ यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom