Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती होणार

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती होणार

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार आरोग्य विभागाची कार्यवाही

रुग्णालयातील रिक्त जागा व अन्य समस्याही लवकरच सुटणार

भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्याने महिलां रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांना उपचारासाठी समस्या निर्माण होत होत्या. अनेक वर्षा पासून ही प्रश्न कायम होता. याबाबत नागरिकांनी तसेच भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी याबाबत वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ नियुक्त बाबत तात्काळ कार्यवाही गरजेची असल्याचे सांगितले. त्यानुसार मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती बाबत निर्णय घेण्यात आला आहे. स्त्रीरोग तज्ञ आठवड्यातून दोन ते तीन दिवस मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवेत असणार आहेत. याबाबत आदेशपत्र दोन दिवसात प्राप्त होईल. अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. अशी माहिती देताना बाबा मोंडकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. अनेक वर्ष रिक्त असलेल्या या पदावर नियुक्ती मिळणार आहे.

स्त्रीरोग तज्ञ कायमस्वरूपी मिळावी तसेच ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा व अन्य समस्या ही आमदार निलेश राणे आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून सोडवतील. त्याबाबत आमदार यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे मोंडकर यांनी माहिती देताना सांगितले.

rapan bottom