Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ मालवण युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कुडाळ मालवण युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

युवासेना जिल्हाप्रमुख पदी ऋत्विक सामंत तर युवतीसेना जिल्हाप्रमुख पदी सोनाली पाटकर यांना पुन्हा संधी

33 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मिली मिश्रा | कुडाळ : प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या युवासेना कुडाळ मालवण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. युवासेना जिल्हाप्रमुख (कुडाळ-मालवण) पदी ऋत्विक सामंत तर युवतीसेना जिल्हाप्रमुख (कुडाळ-मालवण) पदी सोनाली पाटकर यांना फेरनियुक्ती देण्यात आली आहे. एकूण 33 जणांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी महाराष्ट्र राज्याचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी जाहीर केली असून बहुतांश सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या स्वाक्षरीने युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या कुडाळ-मालवण विधानसभा पदाधिकारी जाहीर करण्यात येत आहेत.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करण्यासाठी सर्वाना सोबत घेऊन यापुढेही सातत्यपूर्ण प्रयत्नाशील राहणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांनी सांगितले.

युवासेना पदाधिकारी

ऋत्विक सामंत युवासेना जिल्हाध्यक्ष (कुडाळ मालवण), हर्षद पारकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष (कुडाळ मालवण), संदेश नाईक जिल्हा उपाध्यक्ष (तालुका कुडाळ), निशय पालेकर जिल्हा उपाध्यक्ष (तालुका मालवण), संग्राम साळसकर जिल्हा सचिव (कुडाळ मालवण), प्रीतम गावडे विधानसभा अध्यक्ष (कुडाळ मालवण), निलेश (बंड्या) शिरसाठ जिल्हा उपसचिव (तालुका कुडाळ), कुणाल खानोलकर जिल्हा उपसचिव (तालुका मालवण), चेतन पडते विधानसभा उपाध्यक्ष (तालुका कुडाळ), अभिषेक कांदळगावकर विधानसभा उपाध्यक्ष (मालवण), तथागत मालवणकर तालुका अध्यक्ष (मालवण), मिहिर राणे तालुका अध्यक्ष (आचरा,मालवण), संकेत राऊळ तालुका अध्यक्ष (तारकर्ली देवबाग), सागर वालावलकर तालुका अध्यक्ष (कुडाळ), साईराज दळवी तालुका सचिव (कुडाळ), गोरक्ष पराडकर तालुका सचिव (मालवण), कुणाल बापार्डेकर तालुका उपाध्यक्ष (मालवण), विश्वास पांगुळ तालुका उपाध्यक्ष (कुडाळ), वासुदेव (बाळा) सावंत तालुका उपाध्यक्ष कुडाळ), विनोद सावंत तालुका उपसचिव (कुडाळ), चंद्रकांत मयेकर शहर अध्यक्ष (मालवण), अनंत (आबा) धडाम शहर अध्यक्ष (कुडाळ), मयूरेश लुडबे- शहर सचिव (मालवण), प्रथमेश कांबळी- शहर उपाध्यक्ष (कुडाळ), रोहन पेंडुरकर शहर उपाध्यक्ष (मालवण)

युवती सेना पदाधिकारी

सोनाली पाटकर जिल्हा अध्यक्ष (कुडाळ मालवण), संतोषा नाईक जिल्हा उपाध्यक्ष (कुडाळ), गायत्री गोलम- तालुका अध्यक्ष (कुडाळ), विद्या पाटकर तालुका अध्यक्ष (मालवण), दिपाली कानसे तालुका उपाध्यक्ष (कुडाळ ), पूजा सुतार शहर अध्यक्ष (मालवण), स्मिता सिंघ - शहर अध्यक्ष (मालवण), बेला सामंत शहर अध्यक्ष (कुडाळ)
या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

rapan bottom