मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने शैक्षणिक विषयावर व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली. अध्यापक विद्यालय स्तरावर, मालवण येथील सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदीरचे उपक्रमशील प्राध्यापक नागेश रघुनाथ कदम यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.पारितोषिक वितरण सोहळा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने नुकताच संपन्न झाला.
यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, आय.टी. विभागप्रमुख डॉ. संदिप पवार डॉ. लवू आचरेकर, प्रा. आर.पी. जाधव, प्रा. बाबुराव कांबळे, प्रा. स्नेहल पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते, प्रा. नागेश कदम यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व दहा हजार रु.चे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.प्रा. नागेश यांच्या कदम यांच्या सुयशाबद्दल अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य हेमंत प्रभू सर्व कर्मचारी वर्ग तसेच कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष- बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

