कुडाळ : ज्येष्ठ नागरिक संघ (नेरुर-देऊळवाडा) ची बैठक १३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता नेरुर-देऊळवाडा ग्रा. पं. कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आली आहे.
यात ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे नियम, कायदा, ज्येष्ठांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत नेरुरकर, व सचिव शांताराम सावंत यांनी केले आहे.

