Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण येथे हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रास मंजूरी मिळावी

मालवण येथे हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रास मंजूरी मिळावी

आमदार निलेश राणे यांची पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे मागणी : मंत्री रावल यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : पणन मंडळाच्या माध्यमातून मालवण येथे आधुनिक हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राला मंजुरी मिळावी. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी राजशिष्ठाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

मंत्री जयकुमार रावल यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात आमदार निलेश राणे यांनी याबाबत निवेदन देत आबा उत्पादकांच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली. त्याला मंत्री रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.

आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोकणात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादित केला जातो, उत्पादित आंबा निर्यात व्हावा यासाठी कोकणात पणन मंडळाची दोन निर्यात सुविधा केंद्रे आहेत. त्यात रत्नागिरी नाचणे येथील हापूस आंबा निर्यात केंद्र व देवगड येथील हापूस आंबा निर्यात केंद्र यांचा समावेश आहे. माझ्या मतदारसंघातील मालवण तालुक्यातुनही मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादित केला जातो, जर मालवण येथे हाऊस आंबा निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना राउपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, शीतगृह यासारखी यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात शक्य होईल.

तरी पणन मंडळाच्या माध्यमातून मालवण येथे आधुनिक हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राला मंजुरी द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

rapan bottom