प्रथमेश सावंत - भोसले एस. एस. पी. एम. कॉलेज पडवे येथील विद्यार्थी
सावंतवाडी : सावंतवाडी (भटवाडी) येथील प्रथमेश सुनिल सावंत - भोसले यांनी, पडवे येथील येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज मधून फर्स्ट क्लास मध्ये पूर्ण केले आहे. एस एस पीएम कॉलेज मधील पहिली बॅच बाहेर पडली असून सिंधुदुर्गातील पहिला विद्यार्थी प्रथमेश सावंत - भोसले आहे.
सावंतवाडीतील शांतिनिकेतन चा प्रथमेश विद्यार्थी, त्याला एस. एस .सी बोर्ड परीक्षेत ९१ % गुण मिळाले होते . त्याने प्रशालेतून प्रथम येण्याचा मानही मिळविला होता. तर बारावी परीक्षेत ७५% गुण मिळाले होते.
प्रथमेशला अभ्यासाबरोबर कला - क्रीडा क्षेत्रातही आवड असून त्याने अभिनय क्षेत्रात तसेच सोशल मीडिया , यु ट्यूब यांवर वेगवेगळ्या विषयांवर महत्वपूर्ण असे व्हिडिओ, आवश्यक माहिती तयार केली आहे.
क्रीडा क्षेत्रातही त्याने, रायफल शुटींग या क्रीडा प्रकारात राज्य पातळीवर खेळून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रथमेश सावंत - भोसले है सामाजिक वनीकरण विभाग,कुडाळ येथील श्री.सुनील सावंत - भोसले यांचा सुपुत्र असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

